संगमरत्न फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; दिवाळीनिमित्त फराळ वाटप व वस्त्रदान

संगमरत्न फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; दिवाळीनिमित्त फराळ वाटप व वस्त्रदान

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

दिवाळीचा सण केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता, समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने ‘संगमरत्न फाउंडेशन’च्या वतीने दिवाळीनिमित्त फराळ वाटप आणि वस्त्रदानाचा स्तुत्य उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो अनाथ मुले, निराधार वृद्ध आणि आदिवासी बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्यात आली.या सामाजिक उपक्रमासाठी समाजातील अनेक दानशूर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आर्थिक मदतीसोबतच दिवाळीचा फराळ, जीवनावश्यक वस्तू तसेच नवीन व सुस्थितीतील कपडे देऊन त्यांनी मोलाचे योगदान दिले. दात्यांकडून प्राप्त झालेली मदत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमांतर्गत साई आधार अनाथालय, भाताणे (पालघर), गर्भ सामाजिक संस्था वृद्धाश्रम, कणेर फाटा (विरार), तसेच समर्थ वृद्धाश्रम (विरार), कळंबाई-रानातला पाडा येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी कुटुंबे तसेच आपुलकी वृद्धाश्रम, आळंदी (पुणे) येथे भेट देऊन फराळ, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणात मिळालेल्या या अनमोल भेटीमुळे अनाथ मुले, आजी-आजोबा आणि आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य फुलले.

‘आपण केवळ देणगी देत नाही, तर कोणाच्यातरी आयुष्यात आनंदाचा एक दिवा प्रज्वलित करतो आहोत,’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. देणगीदारांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेले योगदान हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी ताकद आहे. मिळालेली मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.आनंदाने देऊया समाजाचं देणं’ या ब्रीदवाक्याला जागत, गरजूंच्या आयुष्यात आनंदाची पणती पेटविणाऱ्या संगमरत्न फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें