छत्रपती शिवाजी महाराज जयंती हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने उत्साहात साजरी
आहिल्यानगर, प्रतिनिधी
नंदकुमार बगाडेपाटिल
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीरामपूर येथील भगतसिंग चौक (बेलापूर रोड) येथे हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे, जेष्ठ नागरिक तुळशीराम परदेशी, महाराष्ट्र पोलीस सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोंडवे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय जगताप, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बगाडेपाटिल, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, प्रदेश संघटक मनोहर बागूल, उपाध्यक्ष गुरू भुसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय भोंडवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन आदर्श युवापिढीने घ्यावा, त्यांचे विचार आत्मसात करावेत आणि त्यांच्या ग्रंथांचे पारायण करावे, असे सांगितले. महाराजांनी सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांनी महिलांचा सन्मान राखत समाजाला नवा दृष्टिकोन दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास हा समाजासाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गोरख साबदे, ह.भ.प. गोरक्षनाथ शिंदे महाराज, रंगनाथ पितळे, शेख साहेब, आर.जी. शिंदे, चांगदेव मोरे, किशोर भोसले, रमजान शेख, गोरक्षनाथ बनकर आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पारधे, शिवाजी फोपसे, बी. एस. पवार, अविनाश कणगरे, दत्ता मंडलिक, अजय पवार, सौरभ धिवर, प्रमोद गाढे, प्रसाद गाढे, जी.एम. वाघचैरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन नंदकुमार बगाडेपाटिल यांनी केले, तर प्रास्ताविक सुदर्शन अण्णा शितोळे यांनी केले. आभार शहराध्यक्ष बी.एम. पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी चतुर्थी निमित्त फराळाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.