विरार मध्ये अवतरले कोकणचे खेळे मुंबईकरांच्यात आनंदाचे वातावरण
नवी मुंबई (मंगेश जाधव)-कोकण एक संस्कृतीचे माहेर घरआहे कोकणात प्रत्येक १००किलोमीटर नंतर संस्कृती चालीरिती बदलत जातात प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगवेगळी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे संस्कृती असलेले कोकणचे खेळे विरार मध्ये अवतरले आहेत वसई विरार मध्ये संपूर्ण देशातील नागरिक एकोप्याने राहातात आणि हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो.या खेड्याच्याकडे मोठ्या भक्ती भावाने संकासुर गोमु यांची विधीवंत औक्षण करुन पुजा केली जाते.
आपली गाऱ्हाणी खेळ्यांकडे माडली जातात कोकण या भुमीत वेगवेगळ्या संस्कृती पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणचे खेळे शिमगोत्सवात अनन्य साधारण महत्त्व आहे या गोमु संकासुर तुणतुण झांज ढोलकीच्या तालावर नृत्य करतात यावेळी देवदेवता प्रत्येक घरोघरी येवुन आशीर्वाद देतात