जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.3,आंबवणेवाडी शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.3,आंबवणेवाडी
शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त.

तळवली (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावातील आंबवणेवाडी या दुर्गम व ग्रामीण भागातील असणाऱ्या शाळेने आदर्श शाळा पुरस्कार मिळवून एक प्रेरणादायक चित्र निर्माण केले आहे. शाळेने विविध उपक्रम व  अनेक नाविन्यपूर्ण बाबी शाळेत यशस्वीपणे राबवून शाळेस आदर्श बनवले आहे.
शालेय इमारत प्रशस्त असून बोलक्या भिंतीमुळे शालेय वातावरण विद्यार्थीभीमुक झाले आहे,तसेच शालेय परीसरात विविध प्रकारची झाडे लावून शालेय परीसरात बगीचा निर्माण केलेला आहे व परिसर अतिशय सुंदर केलेला असल्याने शाळेत प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटते.

शाळेच्या छतावरील पाणी संकलित करून पाणी जिरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणासुद्धा शाळेमध्ये कार्यरत आहे तसेच कंपोस्ट खत प्रकल्प शालेय परसबाग,अध्ययन अध्यापनात नवनविन तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या नाविन्यपूर्ण बाबी राबवून शाळेने आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर शालेय गुणवत्ता व शिस्त यामध्येही शाळेने अतिशय चांगले काम केले आहे. शाळेला मिळालेला पुरस्कार हा संपूर्ण पाचेरी सडा गावासाठी अभिमानाची बाब आहे.
आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी सन्मा.गटशिक्षण अधिकारी श्री.रायचंद गळवे साहेब यांची प्रेरणा व  सन्मा.विस्तार अधिकारी श्री.विश्वास खर्डे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेत झालेल्या सर्व बदलसाठी मुख्याध्यापक श्री.रोहीत पाटोळे सर व त्यांचे सहकारी मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत प्रशिक्षणार्थी सौ.महाकाळ मॅडम तसेच कंत्राटी शिक्षक श्री.प्रमोद पाष्टे सर या सर्वांचे महत्वपूर्ण योगदान आहे.तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.वृषाली डिंगणकर व शाळेचे मार्गदर्शक श्री.संजयदादा डिंगणकर यांचे विशेष योगदान आहे तसेच आंबवणेवाडीतील सर्व ग्रामस्थ विशेषतः आंबवणेवाडी महिला मंडळ व नवतरुण विकास मंडळ आंबवणेवाडी यांचे प्रामाणिक कष्ट यातूनच शाळेचे चित्र बदलले आहे.
ग्रामस्थ व गावाने ठरवले तर शाळा नक्कीच आदर्श होते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आंबवणेवाडीतील जि.प.आदर्श शाळा पाचेरी सडा नं.3 ही शाळा आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.3,आंबवणेवाडी
शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें