संगमेश्वर पोलिसांची वेषांतर करून अट्टल चोरट्यावर कारवाई; मुद्देमाल हस्तगत

संगमेश्वर पोलिसांची वेषांतर करून अट्टल चोरट्यावर कारवाई; मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई (मंगेश जाधव)

संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षा कक्षात प्रवाशांची बॅग चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला संगमेश्वर पोलिसांनी वेषांतर करून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. आरोपी संतोष चंद्रकांत राणे याच्यावर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांची चाणाक्ष कामगिरी

मार्च महिन्यात संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षा कक्षात महिलांच्या बॅगा चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने व त्याचा ठावठिकाणा मिळत नसल्याने त्याला पकडणे हे मोठे आव्हान ठरले.

वेगळी रणनीती – पोलिसांचा प्रवाशांच्या वेशात सापळा

संतोष राणे हा पुन्हा चोरीसाठी येईल, असा पोलिसांना ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी वेषांतर करून प्रवाशांच्या वेशात प्रतीक्षा कक्षात सहा दिवस सापळा रचला. पाच दिवस अपयश आल्यावरही पोलिसांनी जिद्द सोडली नाही. अखेर ३० मार्च रोजी रात्री १ वाजता एक संशयित इसम बाकड्यावर बसलेला पोलिसांच्या नजरेत आला. विचारपूस केल्यावर त्याने संतोष चंद्रकांत राणे असल्याची कबुली दिली.

चोरीची कबुली आणि मुद्देमाल हस्तगत

आरोपीने संगमेश्वर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७ ग्रॅम चांदी असे २,७०,००० रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

पोलीस पथकाचे कौतुक

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, सी. टी. कांबळे, पी. एस. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संगमेश्वर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल आणि धाडसपूर्ण कारवाईबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें