नेवासा तालुक्यातील श्री संजय ठुबे या शेतकऱ्या समवेत महापारेषण विरोधात शेतकरी संघटना
नेवासा – नेवासे तालुक्यातील सौंदळे येथील शेतकरी श्री संजय ठुबे यांचे शेत जमिनीवर अनधिकृत रित्या महापारेषण कंपनीने कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीने बळजबरीने टॉवर रोखण्याचे काम चालू केलेले आहे .या कामाकरिता पोलीस यंत्रणेचा देखील कंपनीच्या बाजूने वापर करण्यात येत आहे .श्री ठुबे यांच्या मोबदल्याची बाब न्यायप्रविष्ठ असताना आणि त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नसताना महापारेषण ने केलेले अतिक्रमण हे अनधिकृत आहे .या विरोधात श्री ठुबे हे सातत्याने प्रतिकार करत आहेत .परंतु जमीन अधिग्रहण कायद्याच्या बडग्याखाली त्यांच्यावर दडपशाही करण्यात येत आहे .अशा प्रकारची दडपशाही खपवून घेणार नाही असे नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी यांनी सांगितले आहे .
श्री ठुबे यांची शेतजमिन नेवासा शेवगांव रोडलगत असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर आहे . ज्यावेळी टॉवर लाईन शेतातून जाते त्यावेळी टॉवरखाली व तारांखाली विशिष्ठ अंतरापर्यंत पिके येवू शकत नाही . तसेच घर अथवा इतर कृषिउद्योग करण्यास कायदेशीर प्रतिबंध येतो . त्यामुळे सदर शेतकऱ्या च्या पाठीशी नेवासातालुका शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे असे त्यांनी सांगितले .याबरोबरच सदर शेतकऱ्यास सातत्याने त्रास दिला गेला तर रस्त्यावर उतरण्याची भूमिका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी घेतलेली आहे .

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators