मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

( मराठी भाषातज्ञ वि.ना.लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन )

( दुर्वा नाटेकर व हर्षाली काताळकर प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम )

आबलोली (संदेश कदम)

मराठी भाषा पंधरवडा उपक्रम व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच इयत्ता दहावी मराठी विषयबाबत महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष व मराठी भाषातज्ञ विजयकुमार नारायण लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ नुकताच पाटपन्हाळे विद्यालयात संपन्न झाला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्राथमिक गटात दुर्वा दशरथ नाटेकर – गुहागर विद्यालय व माध्यमिक गटात हर्षाली दत्ताराम काताळकर – तात्या वझे पाचेरीआगर विद्यालय या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रम व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पाटपन्हाळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण यांच्या अध्यक्षतेत स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. स्वागत समारंभासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष व मराठी विषयतज्ञ विजयकुमार लांडगे , गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष व वाघांबे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ए.एस.जोशी , मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण , गुहागर मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष एस.बी.चांदिवडे , गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी.गोरीवले , मराठी भाषा मंडळाचे उपाध्यक्ष पी.बी.जाधव , पालपेणे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर. जी.मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन , श्रीशारदा माता व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे व संघटनेच्या उपस्थित पदाधिकारी शिक्षकवृंदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरचे माजी अध्यक्ष व वाघांबे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.एस.जोशी यांचा मराठी भाषा मंडळ संघटनेतर्फे शिक्षक सेवा निवृत्तीबद्दल सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ कार्यक्रमाध्यक्षांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मान करण्यात आला. इयत्ता दहावी मराठी विषयाचे मार्गदर्शक वि.ना.लांडगे यांचा मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ कार्यक्रमाध्यक्षा चव्हाण यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित मान्यवरांनी गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे राबवले जाणारे उपक्रम व योगदान याबाबत अभिनंदन करून सन्मान केल्याबद्दल धन्यवाद दिले.

मराठी भाषातज्ञ व मार्गदर्शक वि.ना. लांडगे यांनी उपयोजित लेखनबाबत प्रश्नपत्रिकातील गुणांचा तपशील , विद्यार्थ्यांनी गुण वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न , उत्तर पत्रिका कशा पद्धतीने तपासल्या जातात , मराठीचा पेपर लिहिताना रचना सौंदर्य व भाव सौंदर्याला महत्त्व , लेखन व्यवहार ज्ञान करणे महत्त्वाचे , पत्रलेखन , सारांश लेखन , जाहिरात , बातमी लेखन, कथा व निबंध लेखन , आदर्श उत्तर पत्रिका नमुना , लेखनात नाविन्यता किंवा वेगळेपणा कसा असावा , मराठीचे व्याकरणदृष्ट्या करावयाचे लेखन , उत्तर पत्रिका लिहिताना विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका व दुर्लक्ष आदी महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार तंत्रज्ञान सादरीकरणाने व फलक लेखनाने उत्तमरीत्या मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सदर इयत्ता दहावी मार्गदर्शनाबाबत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

द्वितीय सत्रात गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मराठी भाषेचे संवर्धन व जतन , मराठी भाषेचे महत्व , मराठी भाषा पंधरवडा उपक्रम व मराठी भाषा गौरव दिन आदी उद्देशाने गुहागर तालुकास्तरीय प्राथमिक – इयत्ता पाचवी ते सातवी व माध्यमिक – इयत्ता आठवी ते दहावी गटात मराठी विषयाबाबत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली. प्राथमिक व माध्यमिक गटात बहुसंख्य विद्यार्थी सदर स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. प्राथमिक गटात कु. दुर्वा दशरथ नाटेकर – गुहागर विद्यालय – प्रथम क्रमांक , मिहीर समिर पुरोहित – पाटपन्हाळे विद्यालय – द्वितीय क्रमांक , आरुषी सचिन भेकरे – जामसूत विद्यालय – तृतीय क्रमांक , निषाद दिनेश भरणकर – एक्सलंट अकॅडमी आबलोली विद्यालय व लावण्या संतोष पांचाळ – आबलोली विद्यालय – उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. तसेच माध्यमिक गटात हर्षाली दत्ताराम काताळकर – तात्या वझे पाचेरीआगर विद्यालय – प्रथम क्रमांक , स्वरा संतोष लांजेकर – मुंढर विद्यालय – द्वितीय क्रमांक , तनुश्री नोमेश कारेकर – तळवली विद्यालय – तृतीय क्रमांक तसेच विदिशा प्रदीप जाधव – गुहागर हायस्कूल व यश लक्ष्मण हुमणे – माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली – उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत व सहभागी विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभासाठी कार्यक्रमाध्यक्ष व मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष एस.बी.चांदिवडे , गुहागर पं.स. शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस.वळवी , गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी , गोरीवले , मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण , मुख्याध्यापक ए.एच.साठे तसेच संघटनेचे पदाधिकारी शिक्षकवृंद मान्यवर म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवर व संघटनेचे पदाधिकारी शिक्षकवृंद यांच्या हस्ते स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक चषक , प्रमाणपत्र , शालेयपयोगी भेटवस्तू व पुष्पगुच्छ तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी एम एस वळवी यांनी गुहागर मराठी भाषा मंडळातर्फे राबवले जाणारे दर वर्षाचे विविध उपक्रम , स्पर्धात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आदी मुद्द्यांनुसार आयोजक , मार्गदर्शक , गुणवंत व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाध्यक्ष व मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष एस.बी.चांदिवडे यांनी उपस्थित मान्यवर , स्पर्धेसाठी सहभागी होणारी विद्यालये व विद्यार्थी , सहभागी व मार्गदर्शक शिक्षकवृंद , तसेच पाटपन्हाळे हायस्कूलचे सहकार्य याबाबत अभिनंदन करून धन्यवाद दिले. मराठी विषयाबाबत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा फायदा , विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांमुळे निर्माण होणारी अभ्यासूवृत्ती आदी मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. कु.तनुश्री नोमेश कारेकर व मिहीर समिर पुरोहित या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्यामुळे मराठी विषयाचे झालेले ज्ञान , जोपासलेली वाचन वृत्ती , स्पर्धा परीक्षांमुळे गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांमध्ये होणारी चढाओढ याबाबत मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावी मराठी विषय मार्गदर्शन वर्गासाठी बहुसंख्य उपस्थित असलेले इयत्ता दहावी व नववीचे विद्यार्थी , प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत व सहभागी विद्यार्थ्यांचे गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे अभिनंदन करण्यात आले. मान्यवर स्वागत समारंभ , इयत्ता दहावी – मराठी विषय मार्गदर्शन वर्ग व विद्यार्थी गुणवंत गौरव समारंभाचे सूत्रसंचालन मराठी भाषा मंडळ गुहागरचे सचिव व पाटपन्हाळे विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक एस.एम.आंबेकर यांनी केले. सदरच्या शैक्षणिक उपक्रमासाठी मराठी विषयतज्ञ वि.ना.लांडगे , सन्मानित मान्यवर ए.एस.जोशी , शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस.वळवी , मुख्याध्यापक व शिक्षकवृंद , गुणवंत व सहभागी विद्यार्थी व विद्यालये आदींच्या सहकार्याबद्दल उपाध्यक्ष पी.बी.जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा