सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित होणार; शासन निर्णय जारी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित होणार; शासन निर्णय जारी

मुंबई – राज्यातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या शहरांतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याच्या उद्देशाने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (२) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नगर विकास विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महसूल, ग्रामविकास, नगरविकास आणि इतर विभागांच्या काही सरकारी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणधारकांकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर भरला जात नाही. त्यामुळे या मालमत्ता भाड्याने दिल्यास महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असा निष्कर्ष नगरविकास विभागाने काढला आहे.

या पार्श्वभूमीवर, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे अथवा शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देऊन नियोजित शहर विकासाला चालना देणे आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या विकास निधी व मालमत्ता कराद्वारे त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने धोरण तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महसूल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, नगरविकास विकास विभागाचे सहसचिव, उपसचिव यांचा समावेश आहे. नगर विकास विभागाचे अवर सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय

इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला   मंडणगड - संदीप शेमणकर तालुक्यातील शेवरे गावातील प्रसिद्ध...
Read More
शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित "नमन" कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद . मुंबई - संदीप शेमणकर गुहागर तालुक्यातील...
Read More
कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारीच्या श्री शिवछत्रपती जन्मोत्सवानिमित्त शनिवार,...
Read More
छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी ‘हे’ तीन तरुण चेहरे चर्चेत

गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी 'हे' तीन तरुण चेहरे चर्चेत पालकमंत्री उदय सामंत कोणाच्या गळ्यात टाकणार सभापतीपदाची...
Read More
गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी ‘हे’ तीन तरुण चेहरे चर्चेत

अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी

अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी

मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न ( मराठी भाषातज्ञ वि.ना.लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन ) ( दुर्वा नाटेकर...
Read More
मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय; नेपाळवर ९ गडी राखून मात, जेसन होल्डरची भेदक गोलंदाजी

वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय; नेपाळवर ९ गडी राखून मात, जेसन होल्डरची भेदक गोलंदाजी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी२०...
Read More
वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय; नेपाळवर ९ गडी राखून मात, जेसन होल्डरची भेदक गोलंदाजी

नालंदा ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

नालंदा ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती   रत्नागिरी...
Read More
नालंदा ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न  ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध
Play sound