चिपळूण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मुझफ्फर खान यांची एकमताने निवड

चिपळूण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मुझफ्फर खान यांची एकमताने निवड

महेंद्र कासेकर उपाध्यक्ष, सुभाष कदम सचिव, तर समीर जाधव खजिनदारपदी; पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रमांचे आश्वासन

तळवली | प्रतिनिधी मंगेश जाधव 

चिपळूणमधील पत्रकारांची एकत्रित आणि संघटित ताकद निर्माण करणाऱ्या चिपळूण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मुझफ्फर खान यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी महेंद्र कासेकर, सचिवपदी सुभाष कदम आणि खजिनदारपदी समीर जाधव यांची निवड करण्यात आली असून ही नवीन कार्यकारिणी पुढील एक वर्षासाठी कार्यरत राहणार आहे.

 

प्रिंट मीडियामधील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी, आरोग्य आणि विमा संरक्षणासारख्या सुविधा मिळवून देण्यासाठी, तसेच समाजाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ही संघटना शासनमान्यता प्राप्त असून, नोंदणीकृत स्वरूपात कार्यरत आहे.

 

आज सकाळी जिल्हा परिषद विश्रामभवनात पार पडलेल्या वार्षिक बैठकीत मावळते अध्यक्ष नागेश पाटील यांनी वर्षभराच्या कामाचा आढावा घेतला, तर जमाखर्चाचा तपशीलही सादर करण्यात आला. यावेळी बोलताना संदिप बांद्रे यांनी संघटनेमुळे समाजात वेगळी ओळख निर्माण झाल्याचे नमूद केले.

 

प्रिंट मीडियात कार्यरत सर्व पत्रकारांनी एक कुटुंब म्हणून काम करावे, एकमेकांना साथ द्यावी आणि समाजाभिमुख पत्रकारिता करावी, असे आवाहन राजेंद्र शिंदे यांनी केले. याचवेळी राजेश जाधव यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे रक्षण आणि सामाजिक दायित्व पार पाडण्याचे महत्व अधोरेखित केले.

 

नूतन अध्यक्ष मुझफ्फर खान यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी विमा संरक्षण, शासकीय योजनांचा लाभ, तसेच सामाजिक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. यावेळी संतोष सावर्डेकर, संतोष कुळे, सुनील दाभोळे, राजेश कांबळे, सुशांत कांबळे, गौरव तांबे आदी पत्रकार उपस्थित होते.

 

हॅशटॅग्स:

#ChiplunJournalistAssociation #MuzzaffarKhan #पत्रकारसंघ #JournalistUnity #PressFreedom #MediaSupport #SocialInitiatives #RatnagiriNews

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें