अखेर पाऊस आला!१२ दिवस आधीच मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर पाऊस आला!१२ दिवस आधीच मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश!

तळकोकणात मान्सूनचं आगमन; शेतकरी सुखावले, मुंबई-पुण्याला येत्या तासांत पावसाचा अंदाज

रत्नागिरी वार्ताहर | २५ मे २०२५

मान्सूनचं अखेर महाराष्ट्रात वेळेआधीच दमदार आगमन झालं आहे. काल केरळात दाखल झालेला मान्सून गोव्याच्या मार्गे आज थेट तळकोकणात दाखल झाला असून नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल १२ दिवस आधीच त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

दरवर्षी सुमारे ७ जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो. मात्र, यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच तो राज्यात दाखल झाला. गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही रस्त्यांवर पाणी साचलं आहे. म्हापसा येथे बाजारपेठांतही पावसाचे पाणी घुसलं आहे.

मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्यानुसार, लवकरच मान्सून मुंबई आणि पुण्यातही दाखल होण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई व ठाण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे.

तळकोकणात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. परिणामी, वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. मान्सूनच्या वेळेपूर्वी आगमनामुळे राज्यातील खरिप हंगामाच्या तयारीला गती मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

#मान्सून2025 #महाराष्ट्रपावसाळा #मान्सूनआगमन #तळकोकणपाऊस #शेतकरीआनंदात #MumbaiRainAlert #RatnagiriNews #रत्नागिरीवार्ताहर

फोटो

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-भांबेड परिसरात दि. २७ मार्च...
Read More
लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज; पिके...
Read More
राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा 📌 माजी सदस्य आशा मिरगे यांचा गौप्यस्फोट; राजकीय नेते...
Read More
अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल 📌 बहादूरशेख नाका येथे तणावपूर्ण परिस्थिती; डीवायएसपी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू...
Read More
चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इंधन टाकीला लागली आग

कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इंधन टाकीला लागली आग सुदैवाने जीवितहानी टळली; इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर पुन्हा एकदा निशाणा...
Read More
कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इंधन टाकीला लागली आग

जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला

जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला जैतापूर दि. २७ (प्रशांत पोवार ) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव...
Read More
जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला

मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; ‘I want to protest’ म्हणत व्यक्त केली नाराजी

मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; 'I want to protest' म्हणत व्यक्त केली नाराजी मुंबई - शिवसेना...
Read More
मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; ‘I want to protest’ म्हणत व्यक्त केली नाराजी

गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद

गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद गिमवी येथे रात्री उशिरा छापा; विना नंबर ४०७...
Read More
गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद

सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला

सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला २५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव – नवोदित...
Read More
सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला