रोजगाराच्या नव्या दिशा! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत मोठे बदल, रत्नागिरी जिल्ह्यात उद्योजकतेला चालना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


📰 रोजगाराच्या नव्या दिशा! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत मोठे बदल, रत्नागिरी जिल्ह्यात उद्योजकतेला चालना

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून पर्यटन व सेवा क्षेत्रातील नव्या संधींना प्रोत्साहन


रत्नागिरी
उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील तरुणांसाठी उद्योजकतेचे नवे दरवाजे खुले झाले आहेत. १ एप्रिल २०२५ पासून लागू होणाऱ्या सुधारित तरतुदींमुळे सेवा व पर्यटनपूरक उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.

या योजनेंतर्गत आता क्लाऊड किचन, जलक्रीडा, प्रवासी वाहतुकीसाठी बोट व्यवसाय, होम-स्टे, कुक्कुट पालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, जलचर व मत्स्यपालन, ढाबा व अन्नविक्री व्यवसाय यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ई-वाहतूक, फिरते विक्री केंद्र, एकाच नाममुद्रेवर आधारित साखळी विक्री व्यवस्था आदींनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.


📌 मुख्य बाबी –

🔹 प्रकल्प किंमत:
सेवा उद्योगासाठी ५० लाख रुपये व उत्पादन उद्योगासाठी १ कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प मान्य.

🔹 खेळते भांडवल:
सेवा उद्योगासाठी ६०% व उत्पादन उद्योगासाठी ४०% मर्यादा.

🔹 वयोमर्यादा व पात्रता:
स्थानिक रहिवासी, किमान वय १८ वर्षे व कोणतेही स्थायी उत्पन्न नसणे आवश्यक.
सेवा उद्योगासाठी ५ लाख व उत्पादनासाठी १० लाखाहून अधिक प्रकल्पासाठी किमान आठवी उत्तीर्ण आवश्यक.

🔹 प्रशिक्षण:
कर्ज मंजुरीनंतर ऑनलाईन किंवा निवासी प्रशिक्षणाची सुविधा.


जिल्ह्यातील युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
📍 जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी इमारत, जे. के. फाईल्स शेजारी, बँक ऑफ इंडियाच्या बाजूला
📞 फोन: ०२३५२-२२२२५४
📧 ई-मेल: didic.ratnagiri@maharashtra.gov.in


🔖 हॅशटॅग्स:

#CMEGP #रोजगारयोजना #उद्योगवाढ #उदयसामंत #रत्नागिरी #तरुणउद्योजक #पर्यटनव्यवसाय #सेवाक्षेत्र #MaharashtraSchemes #StartupOpportunities #मराठीबातमी


📸


✍️ बातमी – [रत्नागिरी वार्ताहर]


जर

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...