ग्रामपंचायत पडवेच्या माजी सरपंच कु. कौसर चिपळूणकर यांचे निधन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

???? दुःखद बातमी

ग्रामपंचायत पडवेच्या माजी सरपंच कु. कौसर चिपळूणकर यांचे निधन

गुहागर, ता. ६ जून :

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत पडवे यांच्या माजी सरपंच व सध्या ग्रामपंचायत सदस्या असलेल्या कु. कौसर रज्जाक चिपळूणकर (मॅडम) यांचे आज (६ जून) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

 

कौसर मॅडम या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जात असून त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकासाच्या विविध कामांत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने ग्रामपंचायत पडवे आणि संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पडवे  सरपंच  श्री मुजीब जांभारकर, उपसरपंच सौ.मानसी वि. सुर्वे, आणि सदस्य तसेच पोलिस पाटील  बाळू गांधी, सुमेध सुर्वे, अमजद खळे, सदाखत जांभारकर,पत्रकार सुजित सुर्वे आणि ग्रामपंचायत कर्मचारी,मान्यवर  ग्रामस्थ  यांनी श्रद्धांजली  वाहिली.

????️ भावपूर्ण श्रद्धांजली!

कौसर मॅडम यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

???? हॅशटॅग्स :

#गुहागर #पडवे #कौसरचिपळूणकर #श्रद्धांजली #NirmalGram #RatnagiriNews

???? फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...