बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध गुन्हा दाखल !

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध गुन्हा दाखल !

 

विजयी मिरवणुकीचा शोकांतिका; ११ मृत्यू, अनेक जखमी – कोहलीही आरोपाच्या भोवऱ्यात

बेंगळुरू (Ratnagiri Vartahar) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या जल्लोषात चक्क शोकांतिका घडली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हजारोंचा जनसागर उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर आयोजकांवर आधीच कारवाई सुरू असतानाच आता स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोहलीवर आयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारून पुरेशी सुरक्षितता न ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस तपासात कोहलीसह अन्य आयोजकांचाही समावेश असून, यामुळे किंग कोहली आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

या घटनेवरुन देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, ‘विजयाचा उत्सव हा नियोजनशून्य असेल तर तो मृत्यूच्या गर्तेतही ढकलू शकतो’ असा गंभीर इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

???? हॅशटॅग्स

#ViratKohli #BengaluruStampede #RCBParade #BreakingNews #ChinnaswamyStadium #RatnagiriVartahar

 

 

 

???? फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...