हातीवले – जैतापूर मार्गावरील बस स्टॉपची दयनीय स्थिती, ग्रामस्थांची संतप्त मागणी: तात्काळ कारवाईची गरज

हातीवले – जैतापूर मार्गावरील बस स्टॉपची दयनीय स्थिती, ग्रामस्थांची संतप्त मागणी: तात्काळ कारवाईची गरज*

???? दारू अड्ड्यांमध्ये बदलले बस स्टॉप ?

???? सोलर लाईट चोरी ?– सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

 

✍️ राजापूर,  राजू सागवेकर प्रतिनिधी

 

महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत 41.23 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या हातीवले – जैतापूर (२४ किमी) रस्त्यावर नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या अराजकतेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली तयार झालेल्या या रस्त्याच्या ठेकेदाराला ५ वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात बस स्टॉप परिसराची दुरवस्था आणि सार्वजनिक सुविधांचा ऱ्हास दिसून येतो आहे.

???? दारू अड्ड्यांमध्ये बदलले बस स्टॉप

काही बस स्टॉप हे दारूच्या अड्ड्यात रूपांतरित झाले असून, तळीरामांनी परिसरात उघडपणे दारू सेवन करून बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या फेकून परिसर विद्रूप केला आहे. फुटलेल्या बाटल्यांमुळे पादचाऱ्यांना दुखापतीचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थी याच ठिकाणी थांबत असल्याने त्यांच्या मानसिकतेवरही याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

???? सोलर लाईट चोरी – सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक प्रवासी आणि वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी बस स्टॉपवर बसवलेले सोलर लाईट्स देखील चोरट्यांनी हुडकून नेले आहेत. या चोऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते, जे अपघातांना निमंत्रण देऊ शकते. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर शिक्षा व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

???? गुरांचा उपद्रव आणि स्वच्छतेचा अभाव

डोंगरतिठा, कोंबे स्टॉप आणि चिरेखण बस स्टॉपवर रात्री गुरांचा मुक्त वावर वाढला असून, ही जनावरे बस स्टॉपच्या आडोशाला आसरा घेत आहेत. यामुळे कचरा, शेणाचे ढिग आणि दुर्गंधी यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे ही परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.

⚠️ अपघात, गुरांची तस्करी आणि वन्य प्राण्यांचे हल्ले

सध्या गुरांची तस्करी, गोहत्या आणि वन्य प्राण्यांचे हल्ले अशा घटना वाढत आहेत. मात्र काही बेजबाबदार गुरे मालक जनावरांना मोकाट सोडून कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. यावर कारवाई करून अशा गुरे मालकांवर दंडात्मक शिक्षेची मागणी होत आहे.

???? मागणी:

प्रत्येक बस स्टॉपवर स्वच्छता मोहिम राबवावी

दारूच्या सेवनावर बंदी आणि पोलिस गस्त वाढवावी

सोलर लाईट पुन्हा बसवून सुरक्षा यंत्रणा बळकट करावी

गुरे मोकाट सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी

सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून देखभाल करावी

⛔ ग्रामस्थ आणि प्रवाश्यांकडून प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी होत असून, याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें