जिल्हा परिषद शाळा कशेळी नंबर 4 येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद शाळा कशेळी नंबर 4 येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

श्री. गणेशभक्त मुकेश चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार

राजापूर – संदीप शेमणकर

कशेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 4 मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नंदकिशोर विश्वनाथ जोशी (जोशी काका) संचलित श्री गणेशभक्त मुकेश चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी पुढाकार घेतला. मनोज सुतार कुटुंबीयांतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सुतारवाडीमधील ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गणेशभक्त मुकेश चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाबाबत सावरेवाडी ग्रामस्थ, सुतारवाडी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक आणि पालकांनी आभार मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...