निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, आणि वनराई, पुणे व एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे उद्दघाटन दीप प्रज्वलन करून तसेच; राज्यगीत, कोंकण कृषी विद्यापीठ गीत आणि वंदे मातरम गायनाने करण्यात आले. उद्दघाटन प्रसंगी सौ. वर्षा सदावर्ते, जीवशास्त्रज्ञ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. हृषीकेश भाटकर, जिल्हा समन्वयक, यु.एन.दि.पी. प्रकल्प यांनी या कार्यक्रमातून मत्स्यव्यावसायिक आणि किनारपट्टीवरील लोकांमध्ये या कार्यक्रमातून जनजागृती निर्माण होईल आणि मत्स्य व्यवसायास चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राची आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हातील प्रशिक्षणार्थीनां प्रशिक्षणाकरिता घेवून येणाऱ्या श्रीमती. गौरी मायनाक, प्रक्षेत्र अधिकारी, वनराई, पुणे यांचे विशेष कौतुक केले. तसेच मत्स्य संवर्धनाद्वारे शाश्वत पर्याय विकसित करणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रा. सचिन साटम यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अपूर्वा सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी केले.

दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खेकडा पालन व निमखारे पाणी व्यवस्थापन या विषयी डॉ. हरीश धमगाये, अभिरक्षक; तर समुद्री शेवाळ संवर्धन या विषयी श्री. चिन्मय दामले जलजीविका, रत्नागिरी तसेच मत्स्य शेतीः रोग व्यवस्थापन व निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती या विषयी डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले. मासे तसेच खेकडे काढणी आणि काढणी पश्चात काळजी यावर प्रा. सचिन साटम यांनी मार्गदर्शन केले. सागरी शोभिवंत मासेः ओळख व निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती या विषयी सौ. वर्षा सदावर्ते, जीवशास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्य शेतीचे अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशिक्षण हस्त पुस्तिका वितरीत करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता करीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक, डॉ. हरिष धमगये, अभिरक्षक व प्राध्यापक; प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी; श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरिता श्री. रमेश सावर्डेकर, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक; कार्यालय अधिक्षक, श्री. श्रीकांत तांबे, श्री. मनीष शिंदे, मत्स्यालय यांत्रिक; श्रीम. जे. जे. साळवी, वरिष्ठ लिपिक; श्री. दिनेश कुबल, बोटमन; श्री. सुहास कांबळे, शिपाई, श्री. सचिन चव्हाण, मजूर, श्री. प्रवीण गायकवाड, क्षेत्र संग्राहक; श्रीम. भूमी भाटकर, श्री. तेजस जोशी, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. योगेश पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम व श्री. अभिजित मयेकर यांनी परिश्रम घेतले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...
Read More
गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत महेश नाटेकर, निलेश सुर्वे व सुचिता घाणेकर यांना...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे ग्रामस्थांची...
Read More
हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

‘निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रत्नागिरी - सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, आणि वनराई, पुणे व...
Read More
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न

लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : “लाठी–काठी स्पर्धांच्या माध्यमातून सेवा सहयोगचा...
Read More
लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न

बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय

बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयसीसी...
Read More
बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय

खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद जाधवची दमदार कामगिरी

🏅 खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद...
Read More
खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद जाधवची दमदार कामगिरी

लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय   आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप महायुतीचे एकहाती वर्चस्व,...
Read More
लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय
Play sound