गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती नुकतीच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४३४ (मुंबई), भिमाई महिला मंडळ आणि धम्मदीप तरुण मंडळ यांच्या विद्यमाने आंध्र प्रजा संघ हॉल, न्यू हनुमान नगर रहिवासी संघ, गोरेगाव (प.) येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धम्मवंदना व त्रिशरण गाथा घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी विचारमंचावर भिमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता धोत्रे, ‘वृत्त दिनांक’च्या पत्रकार मेघना सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिनेश लोखंडे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते ॲड. विशाल वळंजू यांनी माता रमाई यांचा जीवनप्रवास आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडला. तसेच महिला मंडळातील महिलांनीही माता रमाई यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमास शाखेतील अनिल हळदे, रविंद्र गमरे, चंद्रमणी मोहिते, चंद्रकांत गायकवाड, मंगेश जाधव तसेच महिला मंडळातील भक्ती जाधव, मानिषा लोखंडे, रोशनी गमरे, सुप्रिया कदम, पद्ममिनी सूर्यवंशी, वंदना गायकवाड, पौर्णिमा सदाम्हस्के आदींसह शाखेतील सभासद, पदाधिकारी, सल्लागार आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे कार्यकर्ते व भिमाई महिला मंडळाच्या कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. यावेळी उपस्थित शाखेतील सदस्य व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...
Read More
गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत महेश नाटेकर, निलेश सुर्वे व सुचिता घाणेकर यांना...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे ग्रामस्थांची...
Read More
हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

‘निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रत्नागिरी - सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, आणि वनराई, पुणे व...
Read More
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न

लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : “लाठी–काठी स्पर्धांच्या माध्यमातून सेवा सहयोगचा...
Read More
लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न

बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय

बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयसीसी...
Read More
बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय

खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद जाधवची दमदार कामगिरी

🏅 खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद...
Read More
खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद जाधवची दमदार कामगिरी

लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय   आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप महायुतीचे एकहाती वर्चस्व,...
Read More
लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय
Play sound