जि.प.आदर्श शाळा वडेरु या शाळेला आणि विद्यार्थ्यांना युवर बिलीप फाउंडेशन बोरीवली मुंबई यांचेकडून शैक्षणिक साहित्य, वृक्ष व खाऊ वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प.आदर्श शाळा वडेरु या शाळेला आणि विद्यार्थ्यांना युवर बिलीप फाउंडेशन बोरीवली मुंबई यांचेकडून शैक्षणिक साहित्य, वृक्ष व खाऊ वाटप

आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वडेरु या शाळेमध्ये युवर बिलीप फाउंडेशन बोरीवली मुंबई या फाउंडेशनच्या वतीने शाळेला स्मार्ट टीव्ही, कंम्प्युटर, प्रिंटर, ब्लूटूथ स्पीकर, तसेच विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, छत्री, पेन, पेन्सिली, खोड रबर, खेळाचे साहित्य, गोष्टीची पुस्तके, खाऊ व वृक्ष भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी वडेरू ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदी. उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर आत्माराम उकार्डे यांनी केले. त्यानंतर फाउंडेशन च्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. व विद्यार्थ्यांचे नंबर काढून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे देण्यात आली. उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. युवर बिलीफ फाउंडेशन बोरवली मुंबई यांच्या वतीने त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवीत असलेल्या शाळांची माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या बदल कसा झाला त्याचे मार्गदर्शन केले.त्यानंतर श्री . मोने सर यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी उपस्थित सर्वांचे शाळेचे उपशिक्षक श्री. रमेश भिकाजी लोंढे सर यांनी आभार मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...