दक्षिण मुंबईतील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मातोश्री’वर खास भेट; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दक्षिण मुंबईतील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मातोश्री’वर खास भेट; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप

शिवसेना शाखा क्र. २१७ चा उपक्रम; खासदार संजय राऊत, सचिव विनायक राऊत यांची उपस्थिती

दक्षिण मुंबई :

दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी विधानसभा क्षेत्र तसेच शिवसेना शाखा क्र. २१७ मधील दहावी शालांत परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आज खास सन्मान देण्यात आला. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या यशाला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत यांच्यासह विभागातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी ही भेट उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

 

हॅशटॅग :

#ShivSena #UddhavThackeray #LaptopDistribution #Matroshree #StudentInspiration #MumbaiNews #ShivSenaInitiative #EducationSupport #SouthMumbai #ShivSenaBranch217

 

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...