एसटी बसगाड्यांचे परतीचे फेरे सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणी | ग्रामीण प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार?

 

???? एसटी बसगाड्यांचे परतीचे फेरे सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणी | ग्रामीण प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार?

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा–साटवली–पावस–रत्नागिरी–गणपतीपुळे मार्गावर सध्या चालू असलेल्या एसटी बसगाड्यांचे परतीचे फेरे सुरू करण्याची जोरदार मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सकाळी 9:45 वाजता आणि दुपारी 2:45 वाजता चालणाऱ्या बसगाड्या परतीच्या मार्गावर चालवल्या गेल्यास जिल्हा मुख्यालयाशी संपर्क सोयीचा होईल. विशेषतः बेनी सापुचे तळे–कोतापूर–मिरजोळे–जाखादेवी या मार्गांवरील विद्यार्थ्यांना, नोकरदारांना व इतर नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

ग्रामस्थांनी एसटी महामंडळाकडे विद्यमान वेळापत्रकात बदल करून या गाड्या परतीच्या मार्गावर चालवाव्यात, अशी मागणी केली असून, त्याची दखल घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

#रत्नागिरी #एसटीबस #ग्रामीणसेवा #ग्रामस्थमागणी #कोकण #PublicTransport #STBus #Maharashtra #रत्नागिरीवार्ता #RuralConnectivity #Transportation #KokanVikas #लांजा #पावस #गणपतीपुळे #साटवली #कोतापूर #मिरजोळे #बेनीसापुचेतळे #ग्रामविकास #MSRTC

 

 

 

 

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें