शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात शाहू महाराजांची जयंती उत्साहात, ‘सामाजिक न्याय व समता दिन’ साजरा!

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात शाहू महाराजांची जयंती उत्साहात, ‘सामाजिक न्याय व समता दिन’ साजरा!

दहिवली-खरवते येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुढाकार

आबलोली (संदेश कदम)

 

रत्नागिरी: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय, खरवते – दहिवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘सामाजिक न्याय व समता दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख डॉ. हरिश्चंद्र भागडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आणि त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित एक माहितीपट (चित्रफीत) दाखवण्यात आला. या माहितीपटातून शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांनी शिक्षणाचे महत्त्व कसे अधोरेखित केले, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय आणि समतेबद्दल जागरूकता निर्माण झाली.

#ShahumaharajJayanti #सामाजिकन्यायदिन #शरदचंद्रपवारकृषीमहाविद्यालय #दहिवली #खरवते #राष्ट्रीयसेवा_योजना #NSS #समाजकल्याण #रत्नागिरी #छत्रपतीशाहूमहाराज #सामाजिककार्य

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें