गुणवंत विद्यार्थ्यांनो, गुणांसोबत मूल्यांचीही कास धरा – आमदार शेखर निकम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुणवंत विद्यार्थ्यांनो, गुणांसोबत मूल्यांचीही कास धरा – आमदार शेखर निकम

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे गुणगौरव सोहळा; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबतही चर्चा

चिपळूण: “गुण हे यशाचं एक पाऊल असतं, पण मूल्यं ही जीवनाची दिशा ठरवतात,” अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना केवळ गुण मिळवण्याऐवजी मूल्यं जोपासण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कापसाळ येथील माटे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार निकम म्हणाले, “आजच्या यशाचं श्रेय केवळ गुणांपुरतं मर्यादित नसून त्यामागे असलेली मेहनत, चिकाटी, संस्कार आणि पालक व शिक्षकांचे योगदानही तितकंच मोलाचं आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत घेण्यास प्रोत्साहित करत, “परीक्षेत मिळालेले गुण हे अंतिम ध्येय नसावं, तर चांगला नागरिक होण्याचं, समाजाचं ऋण फेडण्याचं आणि देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचं खरं ध्येय असावं,” असं सांगितलं. जीवनातील संकटे, स्पर्धा आणि अपयशांवर मात करण्यासाठी मनोधैर्य, मूल्यं आणि विचारशक्तीच उपयोगी ठरतील यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी विचारांची स्पष्टता, सामाजिक भान आणि आत्मसन्मान जपण्याचं आवाहनही यावेळी केलं. माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच वृक्षारोपण करण्याचं आवाहन करत, झाडांसोबत स्वतःचीही प्रगती साधण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी स्पर्धा परीक्षा, मेहनतीचं महत्त्व आणि योजनाबद्ध अभ्यास यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगत, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात पदवी प्राप्त केलेल्या डॉ. भक्ती पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातून दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या सोहळ्याला उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, ज्येष्ठ नेते दादा साळवी, माजी सभापती सुरेश खापले, पूजाताई निकम, रिया कांबळे, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम, मीनल काणेकर, माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, पांडुरंग माळी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, अदितीताई देशपांडे, उदय ओतारी, युवक तालुकाध्यक्ष नीलेश कदम, किशोर रेडीज, मनाली जाधव, निलेश कोलगे, रविना गुजर, पुर्वा आयरे, पूनम भोजने, विलास सकपाळ, राजा चव्हाण, सचिन साडविलकर, झहीर कुंडलिक, इम्रान खतीब, राजू सुतार, रमेश वरेकर, अजिंक्य शिंदे, जमालुद्दीन बंदरकर, अनिल जोशी, योगेश पवार, मनोज जाधव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#आमदारशेखरनिकम #गुणवंतविद्यार्थी #मूल्यशिक्षण #चिपळूण #राष्ट्रवादीकाँग्रेसअजितपवारगट #गुणगौरवसोहळा #शिक्षण #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थी #विकास

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-भांबेड परिसरात दि. २७ मार्च...
Read More
लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज; पिके...
Read More
राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा 📌 माजी सदस्य आशा मिरगे यांचा गौप्यस्फोट; राजकीय नेते...
Read More
अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल 📌 बहादूरशेख नाका येथे तणावपूर्ण परिस्थिती; डीवायएसपी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू...
Read More
चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल