■ होळी भरतदुर्गा मंदिरात श्रावणी सत्यनारायणाची महापूजा
■ महापुजे निमित्त महिलांची डबलबारी
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर’- ( होळी) :– होळी मधील पेशवेकालीन आई भरत दुर्गा मंदीरात श्रावण महिन्यात दरवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते.या वर्षी सुद्धा ही महापुजा दि.शनिवारी ०२ ऑगस्ट २०२५ रोजी असुन,त्याचबरोबर त्या दिवशी विविध कार्यक्रम करण्यात येतात त्यामध्ये सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दु.आरती तीर्थ प्रसाद,व रात्रौ ठीक ९.०० वाजता महिलांचा डबल बारी जंगी सामना हनुमान प्रासादिक भजन मंडळ देवगड बुवा सौ.प्राजक्ता परब ( सावंत) विरुद्ध श्री देव मालोब प्रासादिक भजन मंडळ देवगड बुवा सौ.विनाश्री पाळेकर यांच्यामध्ये होणार असुन या कार्यक्रमाला परिसरातील सर्व भक्त गणनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घेऊन,सुस्वर भजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री भरतदुर्गा मंदिराचे खोत विघ्नेश गोखले यांनी केले आहे.