माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश, मराठवाड्यात काँग्रेसला धक्का
जालना– शिवसेनेमध्ये 2022 मध्ये फूट पडल्यानंतर, ‘50 खोके, एकदम ओके’ म्हणत एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन गटावर टीका करणारे जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी आपल्या समर्थकांसह त्यांनी हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
कोणतीही अट नाही, विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश
भाजपमध्ये प्रवेश करताना गोरंट्याल यांनी कोणतीही अट ठेवली नसल्याचे स्पष्ट केले आहे. “केंद्र आणि राज्यातील निर्णायक नेतृत्वावर माझा विश्वास आहे. जालन्याचा विकास करण्यासाठी मी भाजपमध्ये येत आहे,” असे त्यांनी सांगितले. जालना शहराच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर निवडून आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्ष जी कोणती जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी परभणीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसची ताकद कमी होत असल्याचे दिसत आहे.
#hashtags
#कैलासगोरंट्याल #भाजपप्रवेश #जालना #मराठवाडा #काँग्रेस #राजकारण #महाराष्ट्र #KailasGorantyal #BJP #Jalna #MaharashtraPolitics