शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाची ‘अ‍ॅग्री व्हिजन २०२५’ मध्ये शानदार कामगिरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि व कृषी संलग्न महाविद्यालयाचे ॲग्री व्हीजन: 2025 मध्ये घवघवीत यश

स्वयं दळी आणि सानिया माने यांचे राष्ट्रीय स्तरावर संशोधन सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.

आबलोली (संदेश कदम)
संपूर्ण देशातील कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी कृषि संशोधन व विस्तार याबाबत मार्गदर्शन तसेच संशोधनात्मक स्पर्धा आयोजित करणारी ॲग्री व्हीजन – 2025 ही कृषि परिषद तिचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच नवी दिल्ली येथील कृषि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद येथे उत्साहात संपन्न झाले.देशभरातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.या परिषदे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संशोधनात्मक पेपर्स, मॉडेल आणि पोस्टर्स प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. स्वयम दळी(कृषी) याने उद्योजकीय उपक्रम व संशोधन विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.तसेच कुमारी सानिया माने (अन्नतंत्रज्ञान) हिने जैविक अर्थ व्यवस्था व टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन विभागामधुन प्रथम क्रमांक मिळवला.कु.स्वयम दळी याने ज्वारी पासुन बनवलेले पापड पीठ व कु.सानिया माने हिने फणसा पासुन बनविण्यात आलेल्या सुप प्रिमिक्स यावर आपले संशोधन सादर केले.या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी उपस्थित कृषि क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज मान्यवर,विविध केंद्रीय आस्थापनामधील वरिष्ठ अधिकारीवर्ग,देशभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू,संचालक व शास्रज्ञ यांनी कु.स्वयम व सानिया यांना भरभरुन दाद दिली.त्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कु.स्वयम दळी व कु.सानिया माने यांना हा प्रकल्प यशस्वीरित्या सादर करण्यासाठी प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व प्रा.रविंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभले.या परिषदेचे महाविद्यालयातील उपक्रम समन्वयक म्हणून प्रा.सुशांत कदम यांनी काम पाहीले.

 

 

 

: Sharadchandraji Pawar Krishi Mahavidyalaya Shines at ‘Agri Vision 2025’

: Sharadchandraji Pawar Krishi College चे विद्यार्थी ‘Agri Vision 2025’ मध्ये अव्वल!

 

 

 

हॅशटॅग्स

* #AgriVision2025

* #SharadchandrajiPawarKrishiMahavidyalaya

* #AgriculturalResearch

* #StudentInnovation

* #JowarPapad

* #JackfruitSoupPremix

* #AgricultureStudents

* #कृषीशिक्षण

* #शेतीतज्ञ

* #नवीदिल्ली

* #SuccessStory

* #StudentsShine

* #FoodTechnology

* #BioEconomy

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...