नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🛫 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वपक्षीय कृती समितीची मागणी; सकारात्मक प्रतिसाद

 

📍 मुंबई प्रतिनिधी | रत्नागिरी वार्ताहर

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुरुवारी (दि. १९ जुलै) याच मागणीसाठी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या मागणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “दिबां”च्या नावासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

 

विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचे उद्घाटन अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांचे नेतृत्व करणाऱ्या दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव या भव्य प्रकल्पाला देण्यात यावे, अशी मागणी अधिक ठाम होत आहे.

 

या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक, समिती अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजिव नाईक, जे. डी. तांडेल, अतुल पाटील, माजी महापौर सागर नाईक यांचा समावेश होता.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत, “केंद्रीय स्तरावरही या नावासाठी पाठपुरावा केला जाईल,” असे स्पष्ट केले. त्यामुळे ‘दिबां’चं नाव आता अधिकृतपणे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

 

 

 

🔖 #नवीमुंबईविमानतळ #दिबा_पाटील #नामकरणआंदोलन #देवेंद्रफडणवीस #गणेशनाईक #रामशेठठाकूर #कपिलपाटील #सर्वपक्षीयशिष्टमंडळ #नवीमुंबई_विमानतळ

 

 

 

📸 फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...