आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक व
‘फकीरा ‘सारखी सामाजिक कादंबरी लिहिणारे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करून
गुहागर ~जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदुर नवानगर मराठी येथे आज दि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.मुद्दमवार मॅडम यांनी भूषविले. आजच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र जांभारकर आणि शिक्षण तज्ञ व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री शंकर कोलथरकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर हे प्रमुख पाहुणे लाभले. आजच्या आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी गायकवाड मॅडम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकेतून करून दिली.प्रान्सी कोळथरकर, अन्वी जांभारकर शौर्या पालशेतकर, आरोही रोहीलकर,दक्ष रोहिलकर श्रीतेज वरवटकर, रेवा पालशेतकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. पदवीधर शिक्षिका मुल्ला मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच ग्रामपंचायत सदस्य मारुती आप्पा रोहिलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या सौ विशाखा रोहिलकर ताई यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंकरजी कोळथरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोज पाटील सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे हे देशभक्त कसे होते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. धीटपणा,अभ्यासू मनमिळावू, संघटना,नेतृत्व कसे असावे, हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम अध्यक्षीय भाषणामध्ये मुद्दमवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गायकवाड मॅडम यांनी केले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.