योगायोगाने उचलला फोन, आणि 7/12 चं काम झटक्यात मार्गी! शंभुराजेंच्या तत्परतेचा व्हिडिओ व्हायरल

📞 योगायोगाने उचलला फोन, आणि 7/12 चं काम झटक्यात मार्गी! शंभुराजेंच्या तत्परतेचा व्हिडिओ व्हायरल

 

साताऱ्यातील दुर्मिळ घटना; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लँडलाईनवर पालकमंत्र्यांनी घेतला कॉल, प्रलंबित तक्रार तात्काळ निकाली

 

सातारा – “सरकारी काम आणि 6 महिने थांब” ही म्हण आपण अनेकदा ऐकली आणि अनुभवली असेल. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील लँडलाईनवरचा कॉल योगायोगाने थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उचलला आणि एका वकिलाचं 7/12 दुरुस्तीचं प्रलंबित काम फक्त काही मिनिटांत मार्गी लागलं.

 

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जलद निर्णयक्षमतेसाठी ओळखले जातात. सातारा दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पत्रकार परिषद सुरू असताना टेबलवरील फोन वाजला. तो उचलून “मी पालकमंत्री बोलतोय” असं सांगत त्यांनी तक्रारदाराचं गाऱ्हाण ऐकलं आणि तात्काळ प्रांतधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रश्न निकाली काढला.

 

ही घटना घडताच जिल्हा प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, “असं जर प्रत्येक वेळी झालं तर अनेकांची अडलेली कामे झटक्यात होतील” असा सूर उमटत आहे. दरम्यान, या व्हिडिओचा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

 

—

 

 

—

 

#शंभूराजदेसाई #सातारा #जिल्हाधिकारीकार्यालय #सरकारीकाम #७१२दुरुस्ती #केदारेश्वरमंदिर #कोरेगाव #महेशशिंदे #MaharashtraNews #ViralVideo

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें