न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे कॅरम क्लबची स्थापना: विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन
मुंबईचे श्री. सुधाकर पाटणकर यांच्या देणगीतून शाळेला कॅरम सेट
सरपंच श्री. राजप्रसाद राऊत यांच्या हस्ते कॅरम क्लबचे उद्घाटन
जिल्हा आणि राज्य स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरावाची उत्तम सोय
राजापुर ~ राजू सागवेकर कडून
मुंबई दादरस्थित श्री सुधाकर राजाराम पाटणकर यांचेकडून कॅरम सेटची देणगी, श्री पाटणकर व जैतापूरचे सरपंच श्री राजप्रसाद राऊत यांचेकडून या महाअखेर एक, एक सेट मिळणार.या कॅरम क्लबचे उद्घाटन *सरपंच श्री राजप्रसाद राऊत* यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.या छोटेखानी कार्यक्रमाला प्रा.आ.केंद्र जैतापूरचे *वैद्यकीय अधिकारी डॉ परांजपे*, आरोग्य सहाय्यक श्री कसालकर, पालक संघाचे श्री उमेश होलम, श्री संकेत लासे, श्री जाधव,सौ.सायली होळकर, श्रीमती वैष्णवी मिठबावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नारे मॅडम, कॅरम मार्गदर्शक श्री आदित्य करगुटकर, सर्व शिक्षक वर्ग, संस्था विश्वस्त श्री दिवाकर आडविरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य स्तरावर या खेळात चमकदार कामगिरी करीत आहेत.त्यांना सातत्याने सराव करण्यासाठी कॅरम साहित्याची गरज होती.श्री पाटणकर व सरपंच यांच्या माध्यमातून प्रेरणादायी उपक्रमाची शाळेत व्यवस्था झालेमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
New English School, Jaitapur gets Carrom Club.
#JaitapurSchool #CarromClub #StudentSports #RajprasadRaut #SudhakarPatankar #SchoolInauguration #EducationalInitiative #SportsInSchools #KhelKhelMein #खेळाडू #जैतापूर















