दापोलीत संस्कार संदेश वह्यांचे वाटप; विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक जबाबदारीचे मार्गदर्शन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दापोलीत संस्कार संदेश वह्यांचे वाटप; विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक जबाबदारीचे मार्गदर्शन.

गाव विकास मंडळ, उंबर्लेचा उपक्रम; ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळेत कार्यक्रम

दापोली – दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना संस्कार संदेश असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

गाव विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश घांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “शिक्षण हे यशाचे प्रमुख साधन असून त्याद्वारे व्यक्ती स्वतःचा विकास करतेच, पण समाजाच्या उन्नतीसाठीही योगदान देऊ शकते. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाप्रती आपली जबाबदारी आहे. समाजाचे ऋण फेडणे आणि आपली बांधिलकी जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, शिस्त आणि सामाजिक मूल्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला.

 

#️⃣ हॅशटॅग्स:

#दापोली #उंबर्ले #संस्कारसंदेश #गावविकासमंडळ #विद्यार्थीप्रेरणा #शिक्षणमहत्त्वाचे

 

📷

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...