ऐन गणेश उत्सवात ST संपावर……?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून.खासगी चालकाना पाचारण करण्याचा महा मंडळाचा विचार …

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. मागण्यांवर अद्याप कोणताच तोडगा निघू न शकल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरुच राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी, गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसगाड्या आगारांमध्येच विसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतून कोकणात जाणाऱ्या एसटीच्या विशेष जादा बस चालवण्यासाठी एसटी महामंडळखासगी चालकांना पाचरण करण्यात येणार असून, त्यासाठी नियोजन सुरू आहे….

दरवर्षी कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायीक झालेले असंख्य कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आवर्जून कोकणातील मुळ गावी जातात. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसगाड्या सोडण्यात सुरुवात झाली. यंदा ४,२०० गट आरक्षणासह एकूण ४,९५३ जादा बस पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. यंदा एसटीने पूर्वीचा विक्रम तोडून सुमारे ५००० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळाच्या या बसगाड्या ३ ते ७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहेत. मात्र, ऐन गणेशोत्सव काळात प्रवाशांची एसटीला मिळालेली पसंती आणि राज्य सरकार, एसटी महामंडळाला कोंडीत पकडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी महामंडळातील ११ कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे कर्मचाऱ्यांचे वेतनाशी निगडीत आर्थिक व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारपासून धरणे आंदोलन पुकारल्याने राज्यातील ५९ आगारे पूर्णत: बंद होती.

मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून ४ सप्टेंबर रोजी १ हजार ६ बस, ५ सप्टेंबर रोजी ३,५१८ बस, ६ सप्टेंबर रोजी २७६ बस सोडण्यात येणार आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू राहिल्यास, जादा बस चालवणे अवघड होईल. संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी बुधवारपासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी चाचपणी सुरू आहे. याबाबत मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या तीन खासगी संस्थांशी चर्चा सुरू आहे, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

औद्योगिक न्यायालयाने मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाला बेकायदेशीर ठरवले आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. कामावर रूज होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam