कोकण ब्लिस रेसिडेन्सेस मध्ये शालेय वृक्षारोपण उपक्रम: पर्यावरण संवर्धनाचा संदेश
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण, शाळेतील शिक्षक व गावकरी झाले सहभागी
गुहागर ~ स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र निमित्ताने वैद्य इन्फ्रा यांच्या कोकण ब्लिस रेसिडेन्सेस प्रकल्पात एक शालेय वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्हा परिषद आदर्श शाळेतील वेलदूर घरटवाडी येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात वैद्य इन्फ्रा यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट अल्पोपहार देऊन करण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, पालकांनी व गावकऱ्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाची महत्वाची शिकवण देण्याचा प्रयत्न केला गेला.
विशेष उपस्थिती: श्रीमती दिव्या सुमित वांकर – सरपंच
श्री. राजू जवळे – उपसरपंच, श्री. विक्रांत वैद्य
श्री. विशाल वैद्य, श्री. राजेश जवळेश्री. स्वरूप मोरे
श्री. नारायण राठोड,,श्री. जालिंदर जाधव, श्री. शिंदे मुख्यद्यापक
तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली व हरित व सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले.
हॅशटॅग्स:
#वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन #शालेयउपक्रम #कोकणब्लिस #स्वातंत्र्यदिन #कोकण #वैद्यइन्फ्रा
फोटो
















