किश्तवाडमध्ये ढगफुटीचा कहर; ६० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता!

किश्तवाडमध्ये ढगफुटीचा कहर; ६० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता!

माचैल माता यात्रेच्या ठिकाणी भीषण आपत्ती; बचावकार्य सुरू, लष्कर-एनडीआरएफ घटनास्थळी

📝 
श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चासोती गावाजवळ गुरुवारी पहाटे ढगफुटीची भीषण दुर्घटना घडली असून आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. १६७ जणांना वाचवण्यात यश आले असले तरी, अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत.
या घटनेत २१ मृतदेहांची ओळख पटली असून, वाचवलेल्या ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी सांगितले की, “१०० हून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली आणि चिखलगाळात अडकले असण्याची शक्यता आहे.”
किश्तवाडमधील पद्दार उपविभागातील माचैल माता यात्रेच्या प्रारंभ बिंदूवर ही आपत्ती घडली. यात्रेकरूंच्या बसेस, तंबू, लंगर व दुकाने क्षणात पुराच्या पाण्यात वाहून गेली.
पोलिस उपायुक्त पंकज शर्मा यांनी सांगितले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कराचे ३०० जवान, आरआरचे सैनिक, व्हाईट नाईट कॉर्प्सचे वैद्यकीय पथक आणि स्थानिक प्रशासन बचाव व शोधमोहिमेत गुंतले आहेत.
चासोती गावातील राकेश शर्मा यांनी दिलेल्या हृदयद्रावक अनुभवात सांगितले की, “मी आणि माझा मुलगा ढिगाऱ्याखाली गाडले गेलो, पण एका मोठ्या लाकडाच्या तुकड्याने आम्हाला वाचवले.”


🔖 हॅशटॅग्स :
#किश्तवाड #ढगफुटी #JammuKashmir #माचैलमाता #BreakingNews #RatnagiriVartahar

📸 फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें