🤝 निर्मल ग्रामपंचायत पडवेच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. विलास गडदे यांची बिनविरोध निवड
गुहागर – (दि. 26) तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब 15 ऑगस्टची ग्रामसभा आज उत्साहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच मुजीब जांभारकर यांनी भूषवले.
सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि जमाखर्चाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेविका सौ. पाटील यांनी पंचायतमधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर आणि विकासकामांविषयी सरपंच जांभारकर यांनी सविस्तर उत्तरे देत मार्गदर्शन केले.
अजेंड्यानुसार, आजच्या सभेत निर्मल ग्रामपंचायत पडवेच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. विलास गडदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री. विलास गडदे हे परिसरात सर्वांच्या अडी-अडचणीला धावून जाणारे तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणारे म्हणून परिचित आहेत. त्यांच्या निवडीचे सरपंच मुजीब जांभारकर आणि ग्रामस्थांनी स्वागत करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
📌 वरील फोटो ला क्लीक करा आणि GR पहा. महाराष्ट्र शासन 👆
या सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, शमा मखजनकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गडदे, पोलिस पाटील अनंत गांधी, सुमेध सुर्वे, अमानत जांभारकर, विनायक भोसले, दत्ता .टक्के, पराग कोळवणकर, सचिव नईम मखजनकर, ओंकार गडदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
🏷️ हॅशटॅग्स :
#ग्रामसभा #निर्मलग्रामपंचायत #पडवे #गुहागर #तंटामुक्तीअध्यक्ष #ग्रामविकास #रत्नागिरीवार्ताहर
📸 फोटो