शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दापोली येथील हॉटेल अभिषेक येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाची जाहीर सभा

शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दापोली येथील हॉटेल अभिषेक येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाची जाहीर सभा

आबलोली (संदेश कदम)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका दापोली या राजकीय पक्षाची जाहीर सभा शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता दापोली तालुक्यातील भाटकर हॉस्पिटलच्या पुढे हॉटेल अभिषेक येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे, दापोली तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रुके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. रेश्मा नेवरेकर, उपाध्यक्ष सौ.रेश्मा जाधव, सरचिटणीस सौं.दीक्षा रुके, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र जाधव, सरचिटणीस अंकित कदम आदी.मान्यवर उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन करणार आहेत

या जाहीर सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाचा शुक्रवार दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांती भूमी महाड येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला – पुरुष कार्यकर्त्यांचे, सभासदांचे आणि गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तयारी बाबत आढावा घेऊन ठाम निर्धार करण्यात येणार आहे तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दापोली तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत क्रियाशील सदस्यांना पदनियुक्तीचे पत्र आणि आय कार्ड ( ओळखपत्र ) त्वरित करण्यात येणार आहे तरी या सभेला दापोली तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या बेसिक कार्यकारणी महिला आघाडी व युवक कार्यकर्त्यांनी वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे दापोली तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रुके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें