💥💥 ब्रेकींग बातमी
🟣 राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; २५ जिल्ह्यांना यलो तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई– राज्यात आज ३ सप्टेंबरपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वारे व वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नाशिक घाटमाथा परिसरात जास्त पावसाचा इशारा आहे. जळगाव जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा धोका असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतही अशाच स्वरूपाचे वातावरण राहणार आहे. अमरावती जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
🌧️ राज्यभर पावसाचं प्रमाण वाढणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नद्या, नाल्यांजवळ न जाणं, गरज नसताना प्रवास टाळणं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक आहे.
📌 हॅशटॅग्स :
#MaharashtraRains #WeatherAlert #IMD #OrangeAlert #YellowAlert #Monsoon2025 #RatnagiriVartahar
📸 फोटो















