माटलवाडी युवा प्रतिष्ठान कुडली माटलवाडी यांचे कडून कुडली नं. 3 शाळेला 40 खुर्च्यांची भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माटलवाडी युवा प्रतिष्ठान कुडली माटलवाडी यांचे कडून कुडली नं. 3 शाळेला 40 खुर्च्यांची भेट

आबलोली (संदेश कदम)

गेली दहा वर्षे गुहागर तालुक्यातील कुडली गावातील माटलवाडी युवा प्रतिष्ठान शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांचे फार मोठे संघटन कुडली माटलवाडी गावांमध्ये कार्यरत आहे.

या माटलवाडी युवा प्रतिष्ठान यांचे कडून दरवर्षी शाळेला विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. गेल्या वर्षी शाळेला साऊंड सिस्टिम आणि दोन फॅन यांची भेट देण्यात आली आणि यावर्षीही कुडली माटलवाडी शाळा नं. 3 या शाळेला विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला बसण्यासाठी 40 खुर्च्यांची देणगी देण्यात आली.

या शाळेचा भौतिक विकास होण्यासाठी फार मोठे मोलाचे सहकार्य माटलवाडी युवा प्रतिष्ठान मार्फत शाळेला केले जाते. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे माजी विद्यार्थ्यांचे संघटन म्हणून ओळखले जाणारी माटलवाडी युवा प्रतिष्ठान गावाच्या व शाळेच्या विकासासाठी कायम तत्पर आहे. शाळेने यावर्षी सुमारे 13 लाख रुपयाचा विक्रमी शैक्षणिक उठाव केल्यामुळे व उत्तम कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षकांचा गौरव युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी या गावचे माजी उपसरपंच व गुरव श्री. पांडुरंग पिलाजी थोरसे तसेच गुरव शांताराम थोरसे, पुजारी यशवंत थोरसे, कारभारी आणि ग्रामस्थ तसेच माटलवाडी युवा प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष सचिन थोरसे, सेक्रेटरी मोहन माटल आणि युवा प्रतिष्ठानचे सर्व प्रतिनिधी आणि कार्यकारिणी सभासद, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि वर्षभरामध्ये केलेल्या शालेय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहन माटल यांनी केले शेवटी श्री. सचिन थोरसे यांनी सर्वांचे आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा