शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी शृंगारतळी येथे संत तुकाराम मध्यवर्ती (घा. व कि.) ग्राहक सह.भांडार लि. संचलित गुहागर बाजार या संस्थेच्या 41 व्या सर्वसाधारण सभेचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे संत तुकाराम मध्यवर्ती (घा. व कि.) ग्राहक सहकारी भांडार लिमिटेड या संस्थेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील गुहागर बाजार भवनच्या लोकनेते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बंडल सभागृह येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सदस्यांनी या सभेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संचालक मंडळाच्या आदेशानुसार व्यवस्थापक गणेश मारुती खैरे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे















