एसटी बसमधून प्रवासादरम्यान महिलेची पर्स हरवली; सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रांचा समावेश

एसटी बसमधून प्रवासादरम्यान महिलेची पर्स हरवली; सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रांचा समावेश

 

सावर्डे–तोंडली प्रवासादरम्यान घडली घटना, सावर्डे पोलिस ठाण्यात नोंदवली तक्रार

 

सावर्डे 🙁 सुजित सुर्वे)

तोंडली (पिलवली) गावातील उर्वशी उमेश खैर या महिलेकडून प्रवासादरम्यान पर्स हरवली आहे. ही घटना दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सावर्डे ते तोंडली जाणाऱ्या एसटी बसमध्ये घडली.

सुमारे दुपारी दीड वाजता सावर्डेवरून सुटलेल्या बसमध्ये प्रवास करत असताना उर्वशी खैर यांनी हातातील पर्स बसमध्ये विसरली. त्या सव्वादोनच्या सुमारास तोंडली येथे उतरल्या आणि घरी गेल्यानंतरच पर्स हरवल्याचे लक्षात आले.

या पर्समध्ये तीन तोळ्याचे मंगळसूत्र, नथ, काही रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. या संदर्भात खैर कुटुंबाने त्वरित सावर्डे पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

👉 जर कुणाला ही पर्स सापडली तर ती खालील क्रमांकावर परत करण्याची विनंती करण्यात आली आहे :

उर्वशी खैर : 8652382833

उमेश खैर : 9768319970

देवेश सावंत : 908570705

पर्स परत देणाऱ्या व्यक्तीस योग्य तो मान-सन्मान करण्यात येईल, असे कुटुंबियांनी कळवले आहे.

 

—

 

📌 हॅशटॅग्स

 

#RatnagiriNews #Chiplun #Savarde #STBus #LostPurse #PublicAppeal #Maharasht

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें