इसवली रस्त्याच्या निकृष्ट कामावरून लांजा तालुक्यात खळबळ

 


🛑 इसवली रस्त्याच्या निकृष्ट कामावरून लांजा तालुक्यात खळबळ

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस; उमेश कदम २ ऑक्टोबरपासून उपोषणावर ठाम

लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण

लांजा तालुक्यातील इसवली येथील इझीमा 63 नुसार माठाचा पराजवळील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामाबाबत मोठा वादंग निर्माण झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेत 2024-25 अंतर्गत मंजूर असलेल्या या कामाच्या निकृष्ट गुणवत्तेविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे.

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, लांजा यांनी ठेकेदार उषा प्रवीणकुमार राठोड यांना नोटीस बजावली असून, “काम निकृष्ट दर्जाचे असून ते पूर्ववत करून गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करावे, अन्यथा काळ्या यादीत टाकले जाईल,” असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामस्थ उमेश रामभाऊ कदम यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. “जोपर्यंत संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा त्यांचा ठाम पवित्रा आहे.

या आंदोलनाला इसवलीचे माजी सरपंच सचिन मेस्त्री यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे होणार आहे.

 

 


📌 हॅशटॅग्स:

#लांजा #इसवली #निकृष्टकाम #रत्नागिरी #जिल्हाधिकारीकार्यालय #उपोषण

📷 फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें