रत्नागिरीच्या सामाजिक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉ. अनिल जोशी यांचे निधन
विविध क्षेत्रांत योगदान; अंत्यसंस्कार आज नरवण येथे
गुहागर :
रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले रत्नागिरी मध्यवर्ती बँकचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल जोशी (निवासी नरवण) यांचे शनिवारी रात्री दुःखद निधन झाले आहे.
डॉ. जोशी यांनी गेली अनेक वर्षे वैद्यकीय सेवेत कार्य करत असताना सहकार क्षेत्रातही मोलाची भूमिका निभावली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने गुहागर तालुक्यातील वैद्यकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार रविवार, दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता नरवण येथे करण्यात येणार आहेत.
त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️🙏
—
सुजित सुर्वे ~
















