निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात इसवली ग्रामस्थांचे उपोषण; जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून आश्वासने, पण समाधान नाही

 


🚧 निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात ईसवली ग्रामस्थांचे उपोषण; जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून आश्वासने, पण समाधान नाही

उमेश कदम व सचिन मिस्त्री यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण; कारवाईची मागणी कायम

रत्नागिरी (लांजा) : लांजा तालुक्यातील इसवली येथील ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात जोरदार आवाज उठवला. ग्रामस्थ उमेश कदम व सचिन मिस्त्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केले.

ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाविरोधात गंभीर आरोप करत उपअभियंता यांच्या सैरावैरा पत्रव्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की संबंधित पत्रे वेळेत अर्जदारांना न देता दिशाभूल करणारा कारभार करण्यात आला.

दुपारी १२.३० च्या सुमारास जि.प. अधिकारी उपोषण स्थळी दाखल झाले. त्यांनी,
👉 “पुढील दोन वर्षे रस्त्यावर पडणारे खड्डे आम्ही भरून देऊ,” असे आश्वासन दिले. मात्र उपोषणकर्त्यांनी हे समाधानकारक नसल्याचे स्पष्ट केले.

उपोषणकर्त्यांची ठाम मागणी आहे की मुख्य कार्यकारी अभियंता यांनी थेट उपस्थित राहून भूमिका मांडावी. अखेरीस संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण सुरू ठेवून ते तात्पुरते स्थगित करण्यात आले. तथापि, हा लढा यापुढेही सुरू राहील, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

 

 

 


हॅशटॅग :

#लांजा #विसरली #रस्ता #उपोषण #रत्नागिरीवार्ताहर


📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें