श्रमिक विद्यालयाची जिल्हास्तरावर वर्चस्व राखत विभागस्तरावर होणा-या आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड

highlits

श्रमिक विद्यालयाची जिल्हास्तरावर वर्चस्व राखत विभागस्तरावर होणा-या आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड

 

रत्नागिरी – संदीप शेमणक श्रमिक विद्यालय शिवारआंबेरे,रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय आट्यापाट या खेळांमध्ये 17 वर्षाखालील मुले व 14 वर्षाखालील मुली असे दोन गटांत प्रथम क्रमांकावर बाजी मारली असून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हा आट्यापाट्या या पारंपारिक खेळामध्ये श्रमिक विद्यालयाच्या मुले आणि मुली अशा दोन्ही गटांनी शिक्षण संकुलाचे नाव जिल्ह्यामध्ये रोशन करत विभागासाठी ही टीम तयार झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक असा विविध क्षेत्रांचा ध्यास असणाऱ्या निसर्गवासी सन्माननीय नंदकुमारजी मोहिते सरांच्या इच्छांना पूर्ण करत विद्यार्थी आपले यश त्यांना अर्पण केले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा ध्यास मोहिते सरांना सातत्याने होता. विद्यार्थिनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून श्रमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर थुळ सर, सर्व संस्था पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच क्रीडा शिक्षक दिवाकर तरळ सर, राकेश आंबेकर सर यांचेही कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी खूप खुप शुभेच्छा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें