नांदिवडे किनाऱ्यावर पुन्हा मृत मास्यांचा खच — JSW एनर्जीच्या विषारी पाण्यामुळे समुद्रसंपदा नष्ट?

highlits

💥 नांदिवडे किनाऱ्यावर पुन्हा मृत मास्यांचा खच — JSW एनर्जीच्या विषारी पाण्यामुळे समुद्रसंपदा नष्ट?

 

स्थानिक मच्छीमार संतप्त; शासनाने तातडीने चौकशी करावी, मागणी

रत्नागिरी प्रतिनिधी :

जयगड येथील JSW एनर्जी प्रकल्पाच्या दुष्परिणामांची नांदिवडे ग्रामस्थांना पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या मत्स्यविलयाची पुनरावृत्ती आज नांदिवडे समुद्रकिनारी पाहायला मिळाली. समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं, वटिया अशा बहुमोल मत्स्यसंपदेचे मृतदेह किनाऱ्यावर आढळून आले असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

त्रिमूर्ती मच्छीमार सहकारी संस्थेचे सदस्य आणि जागरूक सामाजिक कार्यकर्ते श्री. जयवंत गजानन आढाव, श्री. संतोष सीताराम हळदणकर आणि श्री. देवीदास श्रीरंग हळदणकर यांनी या घटनेची पाहणी केली. त्यांनी तत्काळ JSW एनर्जीचे जनसंपर्क अधिकारी श्रीयुत नरेश विलणकर यांना याबाबत माहिती दिली. श्री. विलणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मास्यांची तपासणी केली.

 

स्थानिक मच्छीमारांच्या मते, जिंदालच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून भर समुद्रात नियमितपणे सोडले जाणारे विषारी पाणी हाच या मृत्यूंचा मुख्य कारणीभूत घटक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर विषयाकडे अजिबात लक्ष नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

 

यामुळे संतप्त मच्छीमारांनी या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

“JSW एनर्जी कंपनी स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर घाला घालत आहे; शासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी,” अशी मागणी श्री. जयवंत आढाव यांनी केली.

 

स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी लवकरच शासन दरबारी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

 

 

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#Ratnagiri #Jaigad #Nandivde #JSWEnergy #MarinePollution #KonkanNews #Matsyasampada #EnvironmentalDamage #FishermenProtest #RatnagiriVartahar

 

 

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें