“पनवेल महानगरपालिका आयोजित, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित – “दिवाळी पहाट २०२५”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“पनवेल महानगरपालिका आयोजित, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित – “दिवाळी पहाट २०२५”

नवीमुंबई (मंगेश जाधव)
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित वर्ष ९ वी “दिवाळी पहाट” ही सांगीतिक मैफिल वडाळे तलाव, पनवेल येथे अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या कार्यक्रमात सुश्राव्य सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या मधुर आणि भावस्पर्शी सुरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण वडाळे तलाव भारावून गेले आणि उपस्थित प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणात सूरांचे गोड स्वर गुंजून राहिले.

कार्यक्रमाला पनवेल शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये:

पनवेल महानगरपालिका आयुक्त मा. श्री मंगेशजी चितळे
मा. खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब
ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे साहेब
जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशजी कोळी
मा. सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर
मा. विरोधी पक्षनेते श्री प्रीतमजी म्हात्रे
इतर सर्व मान्यवर

यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवणारी ठरली.

या वेळी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी, मा. नगरसेवक व नगरसेविका, सांस्कृतिक सेलचे पदाधिकारी व इतर सर्व पदाधिकारी आणि पनवेलकर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

ही पहाट केवळ सांगीतिक नव्हती, ती एक सांस्कृतिक उर्जा होती – जी पनवेलच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनली.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]