कोतळूक उदमेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्याहस्ते भूमिपूजन.

कोतळूक उदमेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्याहस्ते भूमिपूजन.

कोतळूक उदमेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्याहस्ते भूमिपूजन.

.आबलोली (संदेश कदम)…….सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी माजी आमदार डॉ विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून या कामासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला या कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, भाजपा सरचिटणीस दिनेश बागकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष जगन्नाथ भोसले, कोतळूक सोसायटीचे व्हाईस चेअरमन अनंत चव्हाण, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, आबा आरेकर, भाजपा बुथ प्रमुख अनिल आरेकर, पर्शुराम शिगवण, समीर आरेकर, नरेश बागकर, सुधीर सकपाळ, अजित राणीम, कमलाकर महाडीक, शेखर महाडीक, मनोहर महाडीक, दिपक जाधव, प्रियेश नार्वेकर, दशरथ पांचाळ, अनिल चव्हाण, वैशाली आरेकर, शितल सकपाळ, अंजली राणीम, अस्मिता चव्हाण आदींसह ग्रामस्थ व महिला बहूसंख्येने उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें