ना. प्रविणभाऊ दरेकर यांची गृहनिर्माण स्वय- समूह अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल
( मराठा महासंघ मुंबई च्या वतीने सत्कार)
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं- समूह पुनर्विकास प्राधिकरण मा.ना. प्रविणभाऊ दरेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल अध्यक्ष पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजता, कक्ष क्रमांक ४०३, तिसरा मजला, गृहनिर्माण भवण, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई ५१ येथे संपन्ना झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री, एड. आशिष शेलार पालकमंत्री मुंबई उपनगर, ना पंकज भोयर गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री ,ना. प्रसाद लाड आमदार विधानपरिषद उपस्थित होते.
त्याचबरोबर मुंबईतील अनेक सामाजिक संस्था, मुंबई बॅक सभासद, सहकार भारती सभासद सह अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई विभागीय अध्यक्ष रुपेश मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी उपस्थित राहून ना. प्रविणभाऊ दरेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महासंघाचे प्रविणभाऊ पवार कोकण विभागीय अध्यक्ष, सतिश जाधव उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष, विजय बागवे, संतोष राणे, हरेश मालुसरे, अनिल शेलार, मोहन सावंत, प्रकाश निपाणी, विनोद शिंदे सह आदी सर्व मंडळी उपस्थित होते














