चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर; ४२ हजार मतदार सज्ज – महिला मतदार आघाडीवर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर; ४२ हजार मतदार सज्ज – महिला मतदार आघाडीवर

१४ प्रभागांतून २८ नगरसेवक निवडणार; ७ डिसेंबरला मतदान, ८ डिसेंबरला मतमोजणी

चिपळूण :
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रशासनिक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. एकूण ४२ हजार ५८२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २०,९८६ पुरुष आणि २१,५९६ महिला मतदार असून, महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्षपद महिलांच्या हाती जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेत एकूण १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक निवडून येतील, तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. शहरात ४८ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.

लिगाडे यांनी सांगितले की, निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाणार आहे. त्यासाठी १९ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, ज्यात ५ फिरती पथके आणि २ अतिरिक्त पथके तैनात राहतील. शहर हद्दीत कापसाळ, पेढे, कळंबस्ते, खेर्डी, गुहागर बायपास, गांधारेश्वर आदी ठिकाणी ५ चेक नाके उभारले जाणार आहेत.

यावेळी एक सखी मतदान केंद्र आणि एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात येईल. पोलिस व प्रशासन शस्त्रे ताब्यात घेणार आहेत. रात्री १० नंतर प्रचार थांबवावा लागेल, तर प्रचाराची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपेल.

मतदान ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडेल. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी युनायटेड इंग्लिश स्कूल येथे होईल. तेथेच स्ट्रॉंग रूम तयार करण्यात येणार आहे. मतदानानंतर मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतील. मतमोजणी सकाळी १० पासून दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण करून सर्व निकाल जाहीर केले जातील, असे लिगाडे यांनी सांगितले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात