पडवे ग्रामपंचायतीला ओझोन घंटागाडी मंजूर; कचरामुक्त मोहिमेला गती

पडवे ग्रामपंचायतीला ओझोन घंटागाडी मंजूर; कचरामुक्त मोहिमेला गती

जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा . पालक मंत्री उदय सामंत यांचे कडून निधी मंजूर .

गुहागर (सुजीत सुर्वे-पडवे)– तालुक्यातील निर्मल ग्राम पंचायत पडवे ,ग्रामपंचायतीसाठी कचरामुक्त गावाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. गावात कचरा संकलनासाठी आवश्यक असलेली ओझोन घंटागाडी आता ग्रामपंचायतीला मंजूर झाली आहे.

गावात घंटागाडी मिळावी यासाठी सरपंच श्री. मुजीब जांभारकर यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत जिल्हा वार्षिक योजना 2023-24 मधील नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानातून ही घंटागाडी मंजूर झाली आहे.

सदर कामी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदयजी सामंत यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सरपंच जांभारकर यांनी सांगितले. लवकरच या घंटागाडीचा लोकर्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असून, सरपंच जांभारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या निर्णयामुळे पडवे गावातील कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध व परिणामकारक होऊन कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर पडवे घडवण्याच्या उपक्रमाला नवी गती मिळणार आहे

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें