गुहागर नगरपंचायत : भाजप उमेदवार वैशाली मावळंकर वार्ड 5 मधून बिनविरोध निवड
सिद्धी शेटे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपला मोठा दिलासा; गुहागरमध्ये युतीत उत्साहाचे वातावरण
📰 Guhagar Breaking.
गुहागर (सुजीत सुर्वे ) शहारा तील नगरपंचायतीमध्ये पहिला नगरसेवक बिनविरोध निवडून आला असून, भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवार वैशाली संतोष मावळंकर या वार्ड क्रमांक ५ मधून विजयी ठरल्या आहेत. या वार्डमध्ये केवळ दोनच उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करून उभ्या होत्या. शिवसेना/मनसेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत सिद्धी राजेश शेटे या प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात होत्या.
मात्र, मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच सिद्धी शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, परिणामी वैशाली मावळंकर या बिनविरोध निवडून आल्या. या अनपेक्षित घडामोडीमुळे भाजप आणि स्थानिक युतीत उत्साहाची लाट पसरली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी या निकालाची अधिकृत माहिती दिली. “वैशाली संतोष मावळंकर यांच्या नेतृत्वाखाली गुहागर नगरपंचायतीत विकासाचा नवा अध्याय सुरू होईल,” असे ते म्हणाले. वार्ड क्रमांक ५ मधील या बिनविरोध निकालामुळे निवडणूक प्रक्रियेत गती आली असून, हा विजय युतीसाठी मोठी मिळकत ठरला आहे.














